तयाचा वेलू गेला गगनावरी

Go to content

तयाचा वेलू गेला गगनावरी

Sagar Sawali Dapoli
Published by Sagar More in Sagar Sawali · Monday 06 Nov 2023
Tags: Inauguration
गजबजलेलं कोकण  
गणेशोत्सव, नवरात्री आणि दसरा हे सण पार पडले की आपण सगळेच उत्सुकतेने वाट पाहतो दिवाळीची. कारण मुलांच्या परीक्षा संपून सुट्ट्या सुरु होणार असतात आणि कुठे फिरायला जायचं याच प्लॅनिंग सुद्धा सुरु झालेलं असतं.

गेल्या काही वर्षात कोंकण हजारो पर्यटकांसाठी आकर्षणाच्या केंद्रस्थानी आहे. आणि दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे. आपला रत्नागिरी जिल्हा आणि विशेषकरून दापोली तालुका सुट्टी दरम्यान पर्यटकांनी गजबजलेला असतो.

तयाचा वेलू गेला गगनावरी
कोकणातील पर्यटनाची सुरुवात होण्यामागे 'सागर सावली' चा खूपच मोठा वाटा आहे; असं आम्ही अभिमानानं म्हणतो. कारण ज्या काळात स्थानिकांना पर्यटन नावाचा काही व्यवसाय असतो याची सुद्धा फारशी माहिती नव्हती, त्या काळात स्व. बापू मोरे यांनी १९८९ मध्ये लाडघर इथे 'सागर सावली' ची सुरुवात केली. पर्यायाने कोकणातील पर्यटन व्यवसायाची बीजे रोवली.

आज वेगाने विस्तारणाऱ्या पर्यटनाचे मूळ आमच्या लाडघरच्या 'सागर सावली' मध्ये आहे. अर्थात, कोकणी माणासांचा जिव्हाळा, आपुलकी, प्रेमभाव, निसर्गाला सोबत घेऊन जगण्याची म्हणजे शाश्वत जीवनशैली या इतरही अनेक बाबी इथल्या पर्यटन विस्ताराला कारणीभूत आहेत. या सगळ्याचा सर्वश्रुत विचार करता गेल्या अनेक पिढ्या सुखा-समाधानाने जगणारा कोकणी माणूस पर्यटन व्यवसायात स्थिरावला नसता तरच नवल.

- क्रमशः  

सागर मोरे
सागर सावली

पुढील भागात - पाहुण्यांची मनं जिंकत विस्तारलेलं 'सागर सावली'.


Back to content