पाहुण्यांची मनं जिंकत विस्तारलेलं 'सागर सावली'.

Go to content

पाहुण्यांची मनं जिंकत विस्तारलेलं 'सागर सावली'.

Sagar Sawali Dapoli
Published by Sagar More in Sagar Sawali · Thursday 09 Nov 2023
Tags: HistoryofSagarSawali
११ नोव्हेंबर १९८९, सागर सावलीचा स्थापना दिवस. याच दिवशी कै. बापू मोरे म्हणजे माझे आजोबा यांनी आज कोकणात वेगाने विस्तारणाऱ्या पर्यटन व्यवसायाचं बीज लाडघर च्या समुद्रकिनारी रोवलं. अत्यंत नीटनेटक्या, सध्या पण प्रशस्त रूम्स, खिडकीतून आणि गॅलरी मधून दिसणारा विस्तीर्ण सागर, निवांत बसल्या बसल्या अनुभवता येणारा सांजवारा या साऱ्याची अल्पावधीतच अनेकांना भुरळ पडली.

पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर इथून अनेक हौशी लोक 'सागर सावली' चा पाहुणचार घेण्यासाठी येऊ लागले. एकदा आलेले पुढे सातत्याने येत राहिले. अनेक जण तर आज देखील आवर्जून 'सागर सावली' मध्येच येतात. हव्या त्या तारखेला रूम्स उपलब्ध नसतील तर आपल्या येण्याच्या तारखा बदलतात. पण जेव्हा इथे येतात तेव्हा मनोमन सुखावतात. त्यांना झालेला आनंद, मिळालेले समाधान आम्हाला पाहता क्षणीच जाणवते.

एक काळ असा होता जेव्हा टेलिफोन बंद पडला तर दोन-दोन महिने सुरु होत नसे. त्या कालावधीत पोस्ट कार्ड पाठवून रूम्स बुक करणारे अनेक ग्राहक आम्ही पहिले आहेत. कधी थोडी गैरसोय झाली तर आपुलकीने समजून घेणारे देखील पहिले आहेत.

इथे येणाऱ्या पाहुण्यांची विशेष आवड म्हणजे अस्सल कोकणी खाद्यपदार्थांची मेजवानी. गेली ३४ वर्षे ही लज्जत चाखण्यासाठी हे सर्वजण 'सागर सावली' ला येतात. इथल्या स्वर्णीम आठवणींमध्ये रममाण होतात. आणि आम्हाला कृतकृत्य करून समाधानाने आपापल्या गावी जातात.

त्या प्रत्येक समाधानी पाहुण्याने आमच्यावर दाखवलेला दृढ विश्वास आज दापोली तालुक्यातील लाडघर नावाच्या एका गावातून आणि दोन खोल्यांमधून विस्तारत कर्दे आणि मुरुड या तीन गावात आणि ६४ खोल्यांपर्यंत पसरला आहे.

- क्रमशः  

सागर मोरे
सागर सावली
www.sagarsawali.com

पुढील भागात -
आज, सागर सावली म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सहज-सुंदर मिलाफ.


Back to content