आज, सागर सावली म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सहज-सुंदर मिलाफ.
Published by Sagar More in Sagar Sawali · 11 November 2023
Tags: Celebrating, Overwhelming, 34, years, of, Sagar, Sawali
Tags: Celebrating, Overwhelming, 34, years, of, Sagar, Sawali
११ नोव्हेंबर. सागर सावलीची सुरुवात होऊन आज ३४ वर्षे झाली. माझे आजोबा कै. बापू मोरे यांनी पाहिलेल्या एका छोट्या स्वप्नाने आज अखंड कोकण भूमी पर्यटकांनी गजबजून गेली. जगभर वेगाने विस्तारणाऱ्या पर्यटन व्यवसायाची इथली नांदी यशस्वी झाली. पर्यटन व्यावसायिक म्हणून रुजू पाहणारा, मुळात समाधानी असलेला आणि कष्टाची फिकीर न करणारा कोकणी माणूस, व्यावसायिक म्हणून आज इथे यशस्वी होताना दिसतोय.
३४ वर्षांच्या वाटचालीमध्ये देशभरातून, जगभरातून इथे येणाऱ्या ज्या पाहुण्यांना आम्ही केंद्रस्थानी मानत आलो, त्यांनीच सागर सावलीची सर्वाधिक प्रसिद्धी केली आहे. एकदा आल्यावर पुनःपुन्हा येणारे, आपल्या मित्रमंडळींना, पाहुण्यांना, सहकाऱ्याना सागर सावली बद्दल आग्रहपूर्वक सांगणारे असंख्य ग्राहक आम्हाला कालानुरूप बदल करण्यास, नवनवीन सेवा देण्यास सातत्याने प्रोत्साहित करत असतात. पर्यटन क्षेत्रातील बदलत्या सोयी-सुविधांच्या व्याख्या वेळीच ओळखून आम्ही कालानुरूप केलेले सर्व बदल इथे येणाऱ्या पाहुण्यांची आवड निवड लक्षात घेऊनच केले आहेत. त्यामुळेच आज, सागर सावली म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सहज-सुंदर मिलाफ असल्याचे दिसून येते.
आमच्यासाठी जसे इथे येणारे पाहुणे महत्वाचे आहेत, तसेच आमचे सहकारी सुद्धा. तुम्हाला इथे सर्वच सर्वांच्याच मनात आदरातिथ्याची भावना ओतप्रोत भरलेली आढळेल. या क्षेत्रात खरंतर अनेक आव्हानं आहेत. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन पाहुण्यांना पुरेपूर आनंद देणं, हा इथल्या प्रत्येकाचा मूळ स्वभाव बनला आहे. इतक्या वर्षात आम्ही व्यावसायिक पातळीवर स्वतःला सिद्ध करू शकलो, आमच्या सर्व ग्राहकांची सेवा करू शकलो त्यामागे सागर सावलीच्या सर्वच सहकाऱ्यांचे प्रयत्न आहेत ही विशेष उल्लेखनीय बाब.
ज्या समृद्ध परंपरेवर आम्ही मनोभावे विश्वास ठेवला त्या परंपरेचेच पाईक होऊन, सेवाभाव जपत आम्ही वाटचाल सुरु ठेऊ. सागर सावलीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आनंद आणि समाधान देत राहू.
- क्रमशः
सागर मोरे
सागर सावली
पुढील भागात -
वेगाने बदलतंय कोकण, कोकणातील पर्यटन