वेगाने बदलतंय कोकण, कोकणातील पर्यटन

Go to content

वेगाने बदलतंय कोकण, कोकणातील पर्यटन

Sagar Sawali Dapoli
Published by Sagar More in Tourism in Konkan · Saturday 18 Nov 2023
Tags: TourisminRatnagiri
ज्या किनाऱ्यावर शेकडो नव्हे तर हजारो समुद्री पक्ष्यांचा थवा असतो, तिथेच आज हजारो पर्यटक आलेले, त्या पक्ष्यांच्यात मिसळून गेलेले आणि आनंदात रमलेले पाहिले की नेहमीच मनाला एक आगळंवेगळं समाधान लाभतं.

एक काळ असा होता जेव्हा या किनाऱ्यावर स्वतः स्थानिक कोकणी माणूस देखील क्वचित फेरफटका मारायचा. कारण समुद्र तर त्याच्या परड्यातच. त्याच्यासाठी रोजचाच. ते रोजचं विलोभनीय सौन्दर्य कोकणातील माणसाच्या मनात अगदी पुरेपूर आणि जन्मजात उतरलं आहे. या सौन्दर्याची जगाला भुरळ पडली नसती तरच नवल.

खूप मोठा काळ नाही, अगदी गेल्या एक-दीड दशकातच पर्यटनाने कोकणचा चेहरा मोहरा बदलला आहे. या बदलाला कारण ठरली इथल्या माणसाची सात्विक वृत्ती, मनःशक्ती, सेवाभाव आणि आपुलकी. पिढ्यानपिढ्या निसर्गाशी एकरूप होऊन राहाणारा, ईश्वरीय शक्तीपुढे नतमस्तक होणारा कोकणी माणूस पुढ्यात आलेल्या जागतिक बदलाला सुद्धा तितक्याच सहजतेने सामोरा गेला. कोकणच्या वाडी मध्ये 'होम स्टे' उभी राहिली. समुद्र किनाऱ्याला पर्यटकांचे राहण्याची सोय होऊ लागली. आणि बघता बघता 'निवास न्याहारी'च्या अस्सल कोकणी ढंगाची पर्यटकांना भुरळ पडली. आपलं 'सागर सावली' पर्यटनातील या सर्व बदलांच्या केंद्रस्थानी आहे याचा मनस्वी अभिमान वाटतोय.

सुरुवातीला, म्हणजे ९० च्या दशकात येणारा पर्यटक अनेकांना कोकणाबद्दल भरभरून सांगू लागला आणि त्यांच्या येण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढतच गेला. छोट्या, घरगुती खोल्यांची जागा आता अद्ययावत 'रूम्स' नी घेतली आहे. पूर्वी एसटी ने येणारा पाहुणा आज स्वतःच्या वाहनाने येतोय. प्रवासा दरम्यान असणाऱ्या अनेक ठिकाणांचा तिथे थांबून आनंद घेतोय.

प्रगतीच्या या टप्प्यावर होणारी परस्परावलंबी देवाण घेवाण अधिकच फलदायी होत राहील यात तिळमात्र शंका नाही.  

- क्रमशः  

सागर मोरे
सागर सावली

पुढील भागात -
खाद्यसंस्कृती जपणारं; आपलं कोकण


Back to content